पत्रकाराशी उद्धट वर्तन करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी पत्रकारांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

विदर्भ

पुसद| राजेश ढोले,दिनांक २६ ऑगस्ट

यवतमाळ जिल्हातील मारेगाव येथील पत्रकार सचिन काकडे यांनी गाव विकासात्मक झालेल्या कामाची माहिती ग्रामसेवक निलेश म्हसे यांना मागितली. आपण केलेले बोगस कामाचे पितळ उघडे पडणार या धास्तीने ग्रामसेवक यांनी पत्रकाराला माहिती देण्याची टाळाटाळ करून असभ्य भाषेचा शब्दप्रयोग करीत हूज्जत घातली. पत्रकाराला माहिती न देता असभ्य भाषेचा वापर करीत हूज्जत घालणाऱ्या ग्रामसेवकावर शासनाने दंडात्मक कार्यवाही करावी या करिता उपविभागीय अधिकारी  पुसद यांना  तालूक्यातील पत्रकारांनी निवेदन दिले आहे.

पत्रकारा सोबत उद्धट वागणूक करून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाशी हूज्जत घालून माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाचा जाहीर निषेध नोंदवित पत्रकार राम राठोड, मनोहर बोंबले, बाबाराव उबाळे,शंकर माहुरे, संजय रेक्कावार,अनिल चव्हाण, मंगेश पवार मो.मुबश्शीर शेख, सै.फैजानोद्दीन, बाबा खान बाबू खान, श्रीकांत धर्माळे आदींनी निवेदनावर सह्या करून ग्रामसेवकावर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *