गांजा तस्करीत जळगाव जिल्हा घेतोय आघाडी

जळगाव

जळगाव, दिनांक २७ ऑगस्ट

वाळू तस्करीत कुख्यात झालेला जळगाव जिल्हा गांजा तस्करीतही ओळखला जाऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच एमआयडीसी पोलिसांनी ३८ लाख १६ हजार रुपयांचा गांजा पकडला आहे. काही महिन्यांपूर्वीच अंमळनेर शहरातही लाखो रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला होता. गांजा तस्करीचे प्रकरण समोर येत असल्याने जळगाव जिल्हा गांजा तस्करीतही पुढे येत असल्याचे चित्र आहे.

समाज हा व्यसनाधीन होत चालला आहे. गुटखा, तंबाखू,दारू,सिगारेटचे व्यसन जणू फॅशन झाली की काय असे वाटू लागले आहे. शासनाने गुटखा बंदी केली असताना त्यावर शक्कल लढवून पानमसाला व जर्दा असे दोन वेगवेगळे प्रकार विक्री केले जात आहे. पानमसाला व जर्दा मिक्स करून गुटखा खाण्याचा आनंद घेतला जात आहे. त्यात आता  गांजा या मती गुंग करून टाकणाऱ्या अमली पदार्थाच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढू लागली आहे. तरुणाई गांजाच्या आहारी जाऊन भरकटत चालली आहे.

चिलीममध्ये गांजा कोंबत सिगरेट प्रमाणे कशी ओढला जातो. गांजा ओढणाऱ्यांना गर्दुल्ले म्हणून ओळखले जाते. जळगाव जिल्ह्यात चोपडा- अडावद, बुरहाणपुर मार्गावर गांजा तस्करी होत असल्याचे सांगितले जाते. जळगाव, अमळनेर व भुसावळ सारख्या मोठ्या शहरात गर्दुल्ले कानाकोपऱ्यातल्या आडोसा शोधून गांजा ओढतात.

मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावर ६ क्विंटल ३६ किलो गांजा एमआयडीसी पोलिसांनी खेडीनजिक पकडला. दीड वर्षापूर्वी रेल्वेस्थानकाजवळ लाख रुपये किमतीचा गांजा पकडण्यात आला होता. तांबापुरा, सुप्रीम कॉलनी, कंजर वाडा व शहरातील इतर भागातही  पोलिसांनी गांजा हस्तगत केला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *