साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा- लहुजी क्रांती मोर्चाची राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे मागणी

विदर्भ

• बहुुुुजनवादी संघटनांचेे समर्थन


पुसद| राजेश ढोले,दिनांक २८ ऑगस्ट               साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यासारख्या वाईट चालीरितींना संपविण्यासाठी प्रेरणादायी साहित्य लिहीले.महीलांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडून त्याचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला दिशादर्शक साहीत्य दिले.यामुळे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी पुसद येथील लहुजी क्रांती मोर्चाने राष्ट्रपतींकडेेे निवेदनाद्वारे केली आहे. याा मागणीला बहुजन क्रांती मोर्चाने समर्थन दिले आहे.

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीतुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा नायक फकीरा व्दारे इंग्रजांचा जुलमी कायदा समाजाच्या नजरेत आणुन दिला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या ३५ कादबं-या,१५ कथासंग्रह, नाटक, पोवाडे अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांचे साहीत्य जगभरातील २७ भाषेमध्ये भाषांतरीत झाले आहे.ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी आहेत. ऑगष्ट २००२ साली भारतीय टपाल विभागाने त्यांच्या समाजकार्याचा गौरव करण्यासाठी तिकीट प्रकाशीत केले होते.या थोर समाजसेवकाचे २०२० हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी महामहीम राष्ट्रपती यांना लहुजी क्रांती मोर्चा व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे पुसद तालुका संयोजक सुभाष धुळधुळे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हा संयोजक अयुबखान तहसिन,  बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका सहसंयोजक लक्ष्मण कांबळे , राजेश ढोले, बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे शहराध्यक्ष,जयकिशन कांबळे, विजय निखाते,भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष, आकाश गडधने, सामाजिक कार्यकर्ते  प्रल्हाद स़वगडे, मौलाना आझाद विचार मंचाचे रहेमान चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार, राजु चंदनकर यांनी संघटनेच्या वतीने पाठींबा देऊन साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *