गणेश मंडळाच्या पाठीमागे चालणाऱ्या न्हावी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

क्राइम

• आठ जुगाऱ्यांना अटक  ; १२ हजारांचा मुद्देमाल जप्त


फैजपूर, दिनांक २८ ऑगस्ट

येथून जवळच असलेल्या नावी येथे बस स्थानका मागे गणेश मंडळाच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यांच्याकडून १२ हजार ८६५ रुपये जप्त करण्यात आले आहे. खाऱ्या

न्हावी येथील बस स्थानकानजीक गणेश मंडळाच्या आडोशाला ‌ जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरून सपोनि प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी फौजदार रोहिदास ठोंबरे, सहाय्यक फौजदार  अंबादास पाथरवट, विजय पाचपोळ, पोहेकॉ. उमेश पाटील, सूरदास, वाहे तडवी यांनी  जुगार ‌ खेळणाऱ्या गिरीश शंकर लढे, लोकेश यशवंत चोपडे, हितेश यशवंत चोपडे,अनिल मुरलीधर चोपडे, उल्हास विलास चोपडे, प्रीतेश नरेंद्र पाटील, प्रवीण काशिराम इंगळे, चेतन ललित झोपे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व १२ हजार ८६५ कृपया हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि प्रकाश वानखेडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *