रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेची मागणी

जळगाव

यावल ,दिनांक २८ ऑगस्ट

राज्यातील अनुसूचित समाज घटकातील नागरिकांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई घरकुल योजनेचा निधी वितरित होत नसल्याने असंख्य कुटुंबांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातही सर्वच तालुक्यांमध्ये रमाई घरकुल योजना मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना  पहिल्या व दुसऱ्या टप्प्यानंतर निधी मिळाला नसल्याने ‌ अनेक कुटुंबे ‌ पावसाळी वातावरणात उघड्यावर आले यावल तालुक्यातही रमाई घरकुल योजनेच्या निधीबाबत अनियमितता आढळून येते. यासंदर्भात भीम आर्मी भारत मिशन संघटनेने यावल पंचायत समितीचे  गट विकास अधिकारी निवेदन सादर करून रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.निधी उपलब्ध न करून दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अन्न वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहे. माणसाला निवाऱ्याची गरज असते. त्या अनुषंगाने राज्य शासनातर्फे राज्यातील मागासवर्गीय, दलित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून मातोश्री रमाई घरकुल आवास योजना सुरु केलेली आहे.

ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. त्यातील बहुतेक नागरिकांनी जुने घर तोडून पक्के घरांच्या बांधकामाची सुरुवात केली.या लाभार्थ्यांना शासनाने पहिला व दुसर्‍या टप्प्याचा निधी वाटप केला आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढील निधी मिळाला नसल्याने अनेकांना आपल्या घराचे बांधकाम अपूर्णावस्थेत सोडावे लागले आहे. यातच पावसाळा सुरू झाल्याने या लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबांना उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. पावसाळ्यामुळे अपूर्णावस्थेत असलेली घरे पडण्याची भीती असून त्यातून जीवितहानी होण्याचाही धोका आहे.हे सर्व लक्षात घेऊन रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने निधी उपलब्ध करून न दिल्यास भीम आर्मी भरती येता मिशनतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हा सचिव सुपडू संदानशिव, यावल तालुका उपाध्यक्ष  आकाश तायडे, प्रचार प्रसिद्धी प्रमुख भीमराव सावळे, तालुका सचिव प्रशांत तायडे,सहसचिव गौरव सोनवणे ,राहुल जयकर , पवन लोंढे, आकाश तायडे, सचिन वानखेडे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *