सुप्रीम कोर्टाचा अनादर प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयांचा दंड

राष्ट्रीय

• दंड न भरल्यास तीन महिन्याचा तुरुंगवास


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ३१ ऑगस्ट

सुप्रीम कोर्टाच्या अवमान केल्याप्रकरणी  प्रसिद्ध विधिज्ञ प्रशांत भूषण यांना न्यायालयाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. दंड नाही भरल्यास त्यांना तीन महिन्यांचा तुरूंगवास होऊ शकतो तसंच त्यांना तीन वर्षे वकिलीची प्रॅक्टिस करता येणार नाही. न्या.अरुण मिश्रांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.प्रशांत भूषण यांनी आपल्या दोन ट्वीट्समधून सुप्रीम कोर्ट आणि सरन्यायाधीशांवर भाष्य केलं होतं.

सुप्रीम  कोर्टाच्या अनादर  प्रकरणात प्रशांत भूषण यांना न्यायालयाने २०ऑगस्ट रोजी  दोषी ठरविले होते. सुप्रीम कोर्टात याविषयीच्या शिक्षेबद्दलची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं भूषण यांना बिनशर्त माफी मागायला सांगत दोन दिवसांचा अवधी दिला होता. सोमवारी २४  ऑगस्ट रोजी प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टासमोर आपलं उत्तर देत माफी मागायला नकार दिला होता. मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी या प्रकरणात सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.सुनावणी दरम्यान  न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी अॅटर्नी जनरल केके वेणूगोपाल यांना विचारलं की, याप्रकरणी कोणती शिक्षा सुनावली जावी, असं वाटतं. त्यावर न्यायालयात केकेे वेणुगोपाल यांनी सांगितले होते की, “प्रशांत भूषण यांना कडक समज दिली जावी, जेणेकरून भविष्यात त्यांनी असं कोणतंही विधान करू नये”

     प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्वीट्सवर सर्वोच्च न्यायालयाने सू-मोटो कारवाई करत न्यायालयाचा अवमान झाल्याचा खटला दाखल केला होता.कोर्टाने म्हटलं, “पहिल्या नजरेत आमचं असं मत आहे की ट्विटवरच्या वक्तव्यांमुळे न्यायपालिकेचा अवमान झाला आहे आणि सर्वोच्च न्यायालय आणि विशेषतः भारताच्या सरन्यायाधीशांच्या कार्यालयाप्रति जनतेच्या मनात असलेल्या मान-सन्मानाला या वक्तव्यांमुळे धक्का बसू शकतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *