विठ्ठल मंदिरात प्रवेश करत प्रकाश आंबेडकरांचा आंदोलन

राज्य

• हजारो वारकरी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात घेतला सहभाग


  • मंदिर प्रवेशानंतर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी भाजपाच्या घंटानाद आंदोलनावर वर केली टीका


   •पंढरपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ३१ ऑगस्ट

राज्यातील मंदिर खुली करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वारकरी सेनेने पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात प्रवेश करून आज सोमवार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी केलेले आंदोलन कमालीचे यशस्वी ठरले.पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह वारकरी सेनेचे पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अशा ११ लोकांना मंदिरात सोडले.पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या पश्चिम गेटवर प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेना आणि इतरांचे स्वागत करण्यात आले. मंदिर प्रवेश करून आल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा हजारोच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. लगतच्या इमारतीवरही कार्यकर्ते वारकऱ्यांची अभूतपूर्व गर्दी झाली.

आठ दिवसांत नियमावली तयार करुन मंदिर खुली केली जातील, असं आश्वासन मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

“मंदिर, मशीद, बुध्दविहार सुरु केली जातील असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. त्यासाठी सरकार नियमावली तयार करत असून त्यासाठी आठ दिवस लागतील असं सांगितलं आहे. पण जर आदेश आला नाही तर पुन्हा पंढरपुरात आल्याशिवाय राहणार नाही,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. वंचितच्या आंदोलनाला यश आलं असून लोकभावनेचा आदर केल्याने सरकारचा आभारी असल्याचंही ते म्हणाले आहेत. ८५ टक्के लोक बरे झाले आहेत तर मग घाबरायचं कशाला ? अशी विचारणा करताना पुन्हा या प्रश्नावर लढायला आम्हाला लावू नका असंही ते म्हणाले आहेत.

याआधी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नियम मोडण्यासाठीच आलो आहोत सांगत आंदोलनाला जमलेल्या हजारोंच्या गर्दीचं समर्थन केलं. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, “या लोकांच्या भावना आहेत. “लोकच शासनाला दाखून देत आहेत. हे पाहून सरकारने आपली भूमिका बदलावी,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे असं सांगितलं असता लोक जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही हेच आम्हाला दाखवायचं आहे असं त्यांनी सांगितलं
यापूर्वी,   प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मंदिरं खुली करा अन्यथा पंढरपूरमध्ये आंदोलन करु असा इशारा दिला होता. “दारु, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प. अरुण महाराज बुरघाटे आणि ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला विचारला होता.

यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, कितीही पोलिस बंदोबस्त असला तरी आंदोलन होणारच या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर ठाम राहिल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  पंढरपूर बस डेपो पुढील ४८ तास बंद ठेवण्यात आला आहे.

मंदिर प्रवेश करून आल्यानंतर बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर म्हणाले,आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे.”

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवरही सडकून टीका केली. भाजपने घंटानाद करण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावं आणि मंदिरं खुली . आदेश देण्याची मागणी करावी, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *