माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ३१ ऑगस्ट

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती.गेल्या वर्षी मोदी सरकारने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवलं होतं.

अत्यंत विनयशील, चारित्र्यसंपन्न व नम्र स्वभावाचे असलेल्या प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगालमध्ये मिराटी या छोट्याशा गावात झाला होता. त्यांचे वडील काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते होते. ते एक स्वातंत्र्यसैनिकही होते.१९६९ मध्ये प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्यावेळी मुखर्जी यांनी काँग्रेसकडून राज्यसभेच्या सदस्यपदी वर्णी लागली होती. त्यांचााा राजकीय आलेख नेहमीच चढता राहिला. ते इंदिरा गांधी यांचे विश्वासू सहकारी होते. मात्र, इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नव्हते. यामुळे प्रणव मुखर्जी कमालीचे दुखावले. यादरम्यान,इलस्ट्रेटेड विकली या नियतकालिकाचे संपादक प्रीतीश नंदी यांना प्रणव मुखर्जी यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीनंतर मुखर्जी यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

काँग्रेस पक्षात त्यांचं पुनरागमन १९८८ मध्ये झालं. पण १९९१ च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पुन्हा सत्ता प्राप्त केली. नरसिंह राव पंतप्रधान बनल्यानंतर त्यांचं नशीब पालटलं.पुढे २००४ मध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आणि सोनिया गांधी पंतप्रधान बनणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुखर्जी यांचं नाव पंतप्रधानपदाकरिता पुन्हा चर्चेत आलं.मात्र त्यांच्याऐवजी मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली.

प्रणव मुखर्जी यांची ओळख फक्त राजकीय नेत्यापर्यंत मर्यादित नव्हती. प्रणव मुखर्जी यांना एक अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात ते शिक्षकही होते. इतकंच नव्हे तर त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, लोकसभेचे अध्यक्षपद देखील प्रणव मुखर्जी यांनी भूषवलं आहे. तसंच अनेक सरकारी समित्यांचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *