खा.भावना गवळी व खा.हेमंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून राष्ट्रीय किसान मोर्चाने केले आंदोलन

विदर्भ

पुसद | राजेश ढोले,दिनांक ३१ ऑगस्ट 

केंद्र सरकारने दिनांक ५ जून २०२० रोजी शेतकरी विरोधी काढलेल्या अध्यादेशाचा धिक्कार करत राष्ट्रीय किसान मोर्चाने आज पुसद येथे खा.भावना गवळी व खा.हेमंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळयाचे तहसील कार्यालय परिसरातील जयस्तंभाजवळ दहन करून आंदोलन केले.

राष्ट्रीय किसान मोर्चाने दिनांक १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींना निवेदन देऊन केंद्र शासनाने काढलेल्या दिनांक ५ जूनच्या शेतकरी विरोधातील काढलेल्या तीन अध्यादेशाचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरात ५४३ खासदारांचे पुतळ्याचे प्रतीकात्मक स्वरूपात दहन केले जाईल असे निवेदन दिले होते.त्यानुसार राष्ट्रीय किसान मोर्चाचे आज आंदोलन केले.

यावेळी प्रशासना मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.निवेदनावर राष्ट्रीय किसान मोर्चाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष पुंजाराम हटकर, गणपत गव्हाळे, अय्युब तहसीन खान, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, गणेश पाईकराव,आत्माराम मुकाडे, गणेश कांबळे, संजय इंगोले यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *