सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीमध्ये निधन

राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ११ सप्टेंबर

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीमधील रुग्णालयात निधन झालं आहे.ते गेल्याा काही दिवसांपासून लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना दिल्लीमधील आयएसबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अखेर आज गुरुवार, दिनांक ११ सप्टेंबर रोजी ‌‌‌‌ संध्याकाळी ६.४५ वाजता डॉ. शिव सरीन यांनी अग्निवेश यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं.

स्वामी अग्निवेश यांच  पार्थिव उद्या सकाळी११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील जंतरमंतर रोडवरील कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.त्यांच्यावर उद्या शनिवारी संध्याकाळी ४वाजता गुरुग्राम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील असं बंधुआ मुक्ती मोर्चा आणि सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे कार्यवाह स्वामी आर्यवेश यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *