निळ्या झेंड्याचा अपमान करून दलितांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा ; भीम आर्मी

विदर्भ

पुसद | राजेश ढोले, दिनांक १३ सप्टेंबर

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात निळ्या झेंड्याचा अपमान करत बौद्ध समुदायाच्या महिला व पुरुषांना लाठीचार्ज करून मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी संघटनेने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पुसद येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केली आहे.

भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे प्रदेशाध्यक्षा नेहाताई शिंदे, प्रदेश मुख्य महासचिव व विदर्भ  प्रभारी मनीषभाऊ साठे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  यांना उपविभागीय अधिकारी,पुसद  यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास भिम आर्मी भारत एकता मिशन यवतमाळ जिल्हा आक्रामक पवित्रा घेईल व प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन उभारेल.असा इशारा  देण्यात आला.

निवेदनावर भीम आर्मी भारत एकता मिशनचे विदर्भ उपाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, जिल्हा सरचिटणीस धनराज कांबळे ,आदित्य(सनी)पाईकराव, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे संजयकुमार हनवते,प्रक्षिशक खडसे,मनोज गजभार,रंजीत कांबळे,गौरव धुळधुळे,दीपक भालेराव,अभिषेक पाईकराव,अनिकेत देशमुख,भारत खंदारे,चंदू डांगर,पंकज देठे,वैभव धाड़वे,इत्यादीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *