रिपब्लिकन सेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख तातेराव हनवते यांना जातीय शिवीगाळ करून धमकावणाऱ्या उमरखेड पोलिसांवर कारवाई करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

विदर्भ

पुसद| राजेश ढोले, दिनांक १२ सप्टेंबर

पिंजर येथील प्रकरणासंदर्भात उमरखेड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलेले रिपब्लिकन सेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख तातेराव हनवते यांना जातीय शिवीगाळ करत पोटात दाबून धमकावणाऱ्या पोलिसांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन दिले.

रिपब्लिकन सेनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तातेराव हनवते दिनांक नऊ सप्टेंबर रोजी उमरखेड पोलिस ठाण्यात  पिंजर येथील घटनेबाबत चौकशी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना सपोनि पांचाळ व पोलीस कर्मचारी रुपेश चव्हाण यांनी    पोलिस ठाण्याबाहेर रोखून धरत ठाणेदार बोडके यांना भेटू देण्यास मनाई केली.“तुला नेतेगिरी करायची सवय लागली आहे, खूप दिवसापासून आम्ही तुझी वाट पाहत होतो आता तू आमच्या तावडीत सापडला आहे. असे सांगून जातीय शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा सर्व प्रकार घडत असतानाच ठाणेदार बोडकेेेेे बाहेर आले मात्र त्यांनी विचारपूस न करता तातेराव हनवते यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून जोशी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी पुसदचे डीवायएसपी यांचेकडे दिनांक ९ सप्टेंबर रोजी करून सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

यावेळी रिपब्लिकन सेनेचे उमरखेड तालुका अध्यक्ष करण भरणे, तालुका उपाध्यक्ष गौतम नवसागरे, महासचिव अरविंद धोंगडे, भीम टायगर सेनेचे उमरखेड शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, सचिव विनोद गाडे, उपाध्यक्ष रणजीत काळबांडे, प्रसिद्धीप्रमुख गजानन धोंगडे,प्रकाश वाहुळे,देवानंद पाईकराव,भैयासाहेब धोंगडे,साहेबराव कदम,मा. भि.सावते,प्रकाश धुळे,राहुल साधते,अनिल धुळे,सहदेव शिंगणकर,सुरेश झिंजाडे,प्रभाकर सावते,बाळासाहेब सावतकर,भिमराव कांबळे इत्यादी आजी माजी कार्येकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *