आरोग्य तपासणी साठी सोनिया गांधी राहुल सोबत विदेशात रवाना ; संसदेच्या अधिवेशनात राहणार गैरहजर

राष्ट्रीय

तृणमूल काँग्रेसचे ७ व भाजपाचे १ खासदारही राहणार अनुपस्थित


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १२ सप्टेंबर

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या आरोग्य तपासणी साठी राहुल गांधी यांच्या सोबत विदेशात रवाना झाल्याची माहिती आज शनिवार दिनांक १२सप्टेंबर रोजी सायंकाळी समोर आली आहे.दोन आठवड्यानंतर सोनिया गांधी भारतात परतणार आहेत.यामुळे दिनांक १४ सप्टेंबर पासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात त्या सहभागी होऊ शकणार नाहीत.
कोरोनाचे पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. काही खासदार आपले वय व आरोग्याच्या कारणास्तव संस्थेच्या अधिवेशनात सहभागी होणार नाहीत. त्यामध्ये सोनिया गांधी यांचाही समावेश असून
तृणमूल काँगरेसचे ७ व भाजपचे १ खासदार देखील संसदेच्या अधिवेशनात सहभागी होणार नाहीत. यातील काही खासदारांना पुरणाची लागण झाली होती आणि ते आरोग्याच्या दृष्टीने कोणताही धोका पत्करू इच्छित नसल्याची माहिती मिळत आहे.
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अगंदी यांचा कोरोना अहवाल शुक्रवारीच पॉझिटिव्ह आल्याने ते अधिवेशनात सहभागी होणार नाहीत. दुसरीकडे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोरोना मुक्त झाल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते तब्बल महिनाभरापासून उपचार घेत होते. यामुळे संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्याची शक्यता कमी दिसत आहे.
तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील ४ व राज्यसभेतील ३ खासदारांनी सुध्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभेतील पक्षाचे मुख्य व्हीप शुघेंदू शेखर रॉय यांनी न्यूज एजन्सीला माहिती देताना सांगितले, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना मी पत्र लिहून अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाही असे पत्र लिहिले आहे. शुघेंदु यांनी सांगितले की, अनलॉक संदर्भात गृह सचिवांनी वय वर्ष ६५ यावरील नागरिकांनी घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. राज्यसभा खासदार या नात्याने मी नियम तोडू शकत नाही.
शुघेंदु यांनी न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार तृणमूलचे खासदार संदीप बंदोपाध्याय (वय६७), शिशिर अधिकारी(वय ७८), चौधरी मोहन जटूआ (वय ८२) यांच्यासह सब्रत बक्षी, मानस भुईया आणि सुभाशिष चक्रवर्ती हे सुध्दा राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग (वय८७),एके. एन्टोनी (वय ७९) हे मात्र वाढते वय असतानाही संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात काँग्रेसकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *