अमित शहा यांची तब्ब्येत पुन्हा बिघडली ; एम्स रुग्णालयात दाखल

राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता,दिनांक १३ सप्टेंबर

                “श्वास घेण्यात त्रास होत आल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.केंद्रीय मंत्री अमित शाह यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनी स्वतः ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली होती.गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये अमित शाह यांच्यावर उपचार सुरू होते.

कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर श्वाास घेण्यास त्रास होत असल्याने अमित शाह यांना १८ ऑगस्टला दिल्लीमधल्या ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.काही दिवसांपूर्वीच त्यांना एम्स रुग्णालयातुन सुुट्टी मिळाली होती. मात्र काल शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास श्वास घेण्यात त्रास होत आल्यामुळे अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *