राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुसद तालुका युवक उपाध्यक्षपदी प्रणय थोरात यांची नियुक्ती

विदर्भ

पुसद |राजेश ढोले, दिनांक १३ सप्टेंबर

पुसद तालुक्यातील ईसापुर येथील प्रणय थोरात यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुका पदी उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार इंद्रनील नाईक यांच्या शिफारशीवरून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल कुटे यांनी नियुक्तीपत्र दिले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शन व विचारांनी प्रेरित होऊन तसेच माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी करण्याचा मनोदय नियुक्तीनंतर प्रणय थोरात यांनी व्यक्त केला.

त्यांचे शेख नासिर,इम्रान कुरेशी, महेंद्र थोरात, गोपाल थोरात, प्रशांत थोरात, धम्मानंद थोरात यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *