घटस्फोटीत महिलेशी विवाह केल्याने नातेवाईकांच्या टोमण्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

जळगाव

जळगाव, दिनांक १३ सप्टेंबर

“ दोन मुलांच्या आई असलेल्या घटस्फोटित महिलेसोबत लग्न केल्याने नातेवाईकांच्या टॉमी याला कंटाळून जळगाव येथील खेडी परिसरात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दोन महिन्यापूर्वीच मेहरुण परिसरातील  मंदिरात या तरुणाने घटस्फोटीत महिलेशी विवाह केला होता.”


प्राप्त माहितीनुसार,  जळगाव शहराला लागूनच असलेल्या कुसुंबा येथे दत्तमंदिर जवळ निकेशसिंग राजपूत हा तरुण आई, वडिलांसह राहत होता. महिन्यापूर्वी खेडी येथील दोन मुलांची आई असलेल्या घटस्फोटीत महिलेशी विवाह करून तो खेडी येथेच भाड्याच्या खोलीत पत्नीसह राहायला आला. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास निकेशसिंग राजपूत घरी आला. कोणालाही न सांगता त्याने घराच्या मागच्या खोलीत जाऊन आतून कडी लावून घेत त्याने शेताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला मध्यरात्री देवकर आयुर्वेदिक महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यासंदर्भात औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास महेंद्र गायकवाड व शांताराम पाटील हे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *