प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे वाटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमांना तळोदा येथे सुरुवात

खान्देश नंदुरबार

तळोदा| प्रफुल्ल राणे, दिनांक १४ सप्टेंबर

संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला जाणार असून  तळोदा तालुक्यात पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त १४ सप्टेंबर २० सप्टेंबर पर्यंत सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. सेवा सप्ताहाची सुरुवात बोरद येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या आदेशान्वये व प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करून करण्यात आली.

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. विलासराव डामरे, तालुका सरचिटणीस डॉ. रामराव आघाडी, तालुका सरचिटणीस प्रा. दिनेश मराठे, पं.स.सदस्य विजय राणा ,पं.स. सदस्य  अनिल पवार, भरत पवार, डॉ. पंकज पावरा, डॉ. रिमान पावरा, सौ. अरूणा चौधरी, योगिता वसावे, एस. सी. शेलार, स्नेहल सुर्यवंशी, एन. पी. साळी, भारती भामरे, विकास पाडवी, दिपक जाधव, रविंद्र भिलाव, साजन शेवाळे, गौतम भिलाव, किशोर जाधव, विनोद शेवाळे ई. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *