केंद्र शासनाच्या अन्यायकारक तीन कृषी अध्यादेशाविरोधात राष्ट्रीय किसान मोर्चाचे आंदोलन

विदर्भ

तीन आमदारांचे पुुुुतळेे जाळले


पुसद‌| राजेश ढोले, दिनांक १४ सप्टेंबर

केंद्र सरकारने काढलेल्या अन्यायकारक तीन कृषी अध्यादेशाच्या विरोधात आ.इंद्रनील नाईक,आ. निलय नाईक व आ. डॉ. वजाहत मिर्झा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून राष्ट्रीय किसान मोर्चाचे आज सोमवार,दिनांक १४ सप्टेंबर रोजी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन केले.

केंद्र सरकारने दिनांक ५ जून रोजी कोरोना काळात तीन कृषी अध्यादेश काढून कृषी क्षेत्रात मोठी सुधारणा होणार असल्याचे भासविले  आहे. पहिल्या अध्यादेशानुसार फार्मर्स प्रोड्यूसर अँड  कॉमर्स ऑर्डिनन्स २०२० अंतर्गत प एक देश एक कृषी मार्केट बनवायचे आहे. या अध्यादेशानुसार पॅन कार्ड धारक कोणतीही व्यक्ती, कंपनी, सुपर मार्केट कोणत्याही शेतकऱ्याचा कुठे माल खरेदी करू शकणार आहे. तसेच शेतकरी सुद्धा आपला माल देशात कुठेही विक्री करु शकेल. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री होणार नसून कृषी बाजार समिती संपुष्टात आणले जाणार आहे. तसेच शेतकरी व माल खरेदी करणारी व्यक्ती व कंपनी यांच्यात कोणताही वाद उत्पन्न झाल्यास कोर्टात दाद मागता येणार नाही.शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास  न्यायालयात दाद मागण्याचा त्याचा अधिकार या अध्यादेशामुळे हिरावला जाणार आहे.

दुसऱ्या अध्यादेश इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट मध्ये संशोधन असुन यापूर्वी शेतकऱ्यांकडून म** खरेदी करत व्यापारी साठवणूक करून काळाबाजार करत असत. हे रोखण्यासाठी इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट १९५५ बनविण्यात आला होता. यानुसार व्यापाऱ्यांना एका मर्यादेपर्यंतच कृषी मालाचा साठा करता येत होता. आता या अध्यादेशानुसार आलू, कांदे’ धान्य’ तेल आदी वस्तूंचा साठा करण्यावर कोणतेही बंधन नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे अहित करून धनाढ्य व्यापाऱ्यांचे हीत जोपासले जात आहे. पुढे व्यापारी कृषी मालाचा साठा करून ग्राहकांना जास्त दामात विकतील. अशा प्रकारे शेतकरी व ग्राहक यांची फसवणूक केली जाणार आहे.

तिसरा अध्यादेश फार्मर्स एग्रीमेंट प्राईस इन्शुरन्स अंड सर्विसेस आहे. यानुसार यानुसार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अर्थात कंत्राटी शेतीला बढावा दिल्या जाणार आहे ज्यात मोठ-मोठ्या कंपन्या शेती करतील व शेतकरी फक्त मजुरी करतील. अशाप्रकारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात मजूर म्हणून काम करावे लागेल. या अध्यादेशाच्या माध्यमातून केंद्र सरकार पश्चिमी मॉडेल आमच्या शेतकऱ्यावर लादत आहे. अशा प्रकारे या तीन अध्यादेशाद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना भुमिन करून त्यांना गुलाम बनण्याचे षडयंत्र करत आहे.

शेतकरी हिताच्या विरोधात असणाऱ्या या तीनही अध्यादेशाच्या विरोधात विरोधी पक्षदेखील चुप्पी साधून असल्याने राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राम सुरेश वर्मा यांनी या अध्यादेशाच्या विरोधात चार टप्प्यात राष्ट्रीय स्तरावर आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येेक तहसी कार्यालयात स्थानिक आमदारांची पुतळे जाळण्यात आले. पुसद येथे आ.इंद्रनील नाईक,आ. निलय नाईक व आ. डॉ. वजाहत मिर्झा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे पदाधिकारी गणपत गव्हाळे, लक्ष्मण कांबळे, अयुब खान तहसीन, राजेश ढोले, सुभाष धुळे, प्रल्हाद सवंगडे,राजु चंदनकर.गणेश पाईकराव,फकिरा काळे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *