शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध असलेले तीन अध्यादेश मागे न घेतल्यास केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचा राष्ट्रीय किसान मोर्चाचा इशारा

जळगाव विदर्भ

धरणगाव,दिनांक १५ सप्टेंबर

शेतकऱ्यांच्या हक्क व अधिकार यांच्या विरोधात केंद्र शासनाने काढलेले दिनांक ५ जून २०२० रोजीचे तीन अध्यादेश मागे न घेतल्यास देशपातळीवर मोठे आंदोलन छेडण्याचा  इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष श्री. वर्मा  यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील अध्यादेशाच्या विरोधात आज आज देश पातळीवर राष्ट्रीय किसान मोर्चाने तिसऱ्या टप्प्याची आंदोलन छेडले. धरणगाव येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले.

लॉक डाऊनच्या कालावधीत केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ज्या कृषी व्यवसायाकडे पाहिले जाते त्या शेती आणि शेतकऱ्यांच्या विरोधात ३ अध्यादेश पास केलेत. आज देशाचा जीडीपी – २३.९ एवढा झाला असून सर्व क्षेत्रात देश ऋण स्तरावर आहे फक्त आणि फक्त कृषी क्षेत्रात देश धन स्तरावर आहे.  लॉक डाऊनच्या काळात जे शेतकरी विरोधी निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये दिनांक ५ जून २०२० रोजी केंद्र सरकारने फार्मर्स ट्रेड अँड कॉमर्स ऑर्डिनन्स, इसेन्शियल कमोडिटी (संशोधन) अॅक्ट १९५६ तसेच फार्मर्स अॅग्रीमेंट प्राईज इन्शुरन्स अँड सर्विसेस या अध्यादेशाचा समावेश आहे ‌. हे तीनही अध्यादेश शेतकऱ्यांच्या हक्क-अधिकार विरोधात असून ते परत घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाने केली आहे.

हे अध्यादेश परत घ्या अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या तिसऱ्या शृंखलेतील देशव्यापी आंदोलनाद्वारे देशभरातील तहसिल कार्यालयांना निवेदन आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगाव च्या वतीने देखील तहसिल कार्यालय धरणगाव येथे निवेदन देण्यात आले.                केंद्र  सरकारने काढलेले तीन्ही  अध्यादेश शेतकऱ्यांच्या हिताचे नसून भांडवलदार व व्यापाऱ्यांच्या जास्त हिताचे आहेत. या कायद्यांमुळे संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जर सरकारने हे अध्यादेश रद्द केले नाहीत तर सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.अशी भावना धरणगावचे नायब तहसिलदार श्री. प्रथमेश मोहोळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

भारत मुक्ती मोर्चा , बहुजन क्रांती मोर्चा , छत्रपती क्रांती सेना , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा , बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सहयोगी संघटनांनी राष्ट्रीय किसान मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.

यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सिराज कुरेशी, धरणगाव शहराध्यक्ष नगर मोमीन , बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे निलेश पवार , सामाजिक कार्यकर्ते विकास लांबोळे , भारत मुक्ती मोर्चाचे तालुका प्रभारी गौतम गजरे , मयूर भामरे , किरण सोनवणे , विनोद बिजबीरे , अमोल कोळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *