माजी सैनिकाला मारहाण प्रकरणात खासदार उन्मेश पाटील यांच्या चौकशीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आदेश

जळगाव राज्य

• सन २०१६ मध्ये चाळीसगाव येथील माजी सैनिक सोनू महाजन यांना मारहाण केल्याचा उन्मेश पाटील यांच्यावर आहेे आरोप


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १५ सप्टेंबर

चाळीसगाव तालुक्यातील माजी सैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी खासदार उमेश पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.सन २०१६ मध्ये उन्मेश पाटील आमदार असताना त्यांच्यावर माजी सैनिक सोनू महाजन यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचे बदनामी कारक व्यंगचित्र समाज माध्यमावर पोस्ट केल्याने  नऊ सेनेचे माजी सैनिक मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी झोडपून काढल्याची घटना ताजी आहे. या घटनेमुळे शिवसेनेवर टीका होत असताना भाजपच्या माजी आमदाराने माजी सैनिकाला मारहाण केल्याचे प्रकरण काढण्यात आले आहे.

सन २०१६ मध्ये चाळीसगाव चे आमदार असताना उन्मेश पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप महाजन कुटुंबियांनी केला होता. मात्र त्यावेळेस राज्यात भाजपाची सरकार असल्याने प्रकरण दडपण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महाजन कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना खासदार उन्मेश पाटील यांची चौकशी करून गृहविभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *