पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोरवड (रंजनपुर) येथे वृक्षारोपण

नंदुरबार

तळोदा |प्रफुल्ल राणे, दिनांक १६ सप्टेंबर

‌पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ‌. त्यानिमित्त शहादा विधानसभेचे आमदार  राजेश पाडवी यांच्या हस्ते मोरवड (रंजनपुर) येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी आप गुलाम महाराज यांचे अनुयायी गादी पुरुष आप चंद्रसेन महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. वृक्षारोपण करतेवेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. विलासराव डामरे,जिल्हा उपाध्यक्ष  आनंद सोनार, जेष्ठ नेते  जितेंद्र पाडवी, जिल्हा परिषद सदस्य  भरत पवार,  प्रकाश  वळवी, नारायण  ठाकरे,  रणजित  चौधरी,  प्रवीणसिंह राजपूत,  दारासिंग वसावे, पं.  .सदस्य विजय राणा, चेतन गोसावी, तालुका सरचिटणीस डॉ. रामराव आघाडे, सरचिटणीस प्रा. दिनेश मराठे,  विरसिंग  पाडवी,  बलीराम  पाडवी,  गुड्डू वळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *