हाजीर हो..! बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याप्रकरणी अडवाणींसह सर्व आरोपींनी न्यायालयात हजर राहण्याची सुप्रीम कोर्टाचे आदेश

राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १६ सप्टेंबर

बाबरी मशीद उद्ध्वस्त खटल्याप्रकरणी लालकृष्ण आडवाणी यांच्यासह मुरली मनोहर जोशी, उमा भारती व सर्व आरोपींनी न्यायालयात हजर रहावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. दिनांक ३० सप्टेंबर रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली होती. याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी, कल्याण सिंग, उमा भारती यांच्यावर बाबरी मशिदी पाडल्याचा कट केल्याचा आरोप आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने १९ ऑगस्ट रोजी एक महिन्याचा वेळ मागून घेतला.केंद्रीय अन्वेषण विभागाने या खटल्यात ३५१ साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले. ६०० पुरावे मांडले.

            दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर १ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. विशेष सीबीआय न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव या खटल्याचा निकाल जाहीर करतील. याप्रकरणातली लालकृष्ण अडवाणीसह सर्व आरोपींना अंतिम सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *