नेपानगर विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य पोलिसांची रावेर पोलीस ठाण्यात समन्वय बैठक

जळगाव

रावेर|नजमोद्दिन शेख,दिनांक १६ सप्टेंबर

मध्यप्रदेशातील नेपानगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सीमावर्ती भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसांची समन्वय बैठक रावेर पोलीस ठाण्यात पार पडली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर नेपानगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या सुमित्रा कासदेकर यांनी भाजपात प्रवेश करून आमदार पदाचा राजीनामा दिल्याने नेपानगर विधानसभेची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील  पोलिसांची समन्वय बैठक रावेर पोलीस ठाण्यात संपन्न झाली. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सपोनि‌ शितलकुमार नाईक, पीएसआय मनोज वाघमारे,  लालबाग (म.प्र.) पोस्टेचे एक.पी.सिंग, सहाय्यक फौजदार तिवारी यांनी समन्वय बैठकीत सहभाग घेतला.

यावेळेस सीमावर्ती भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची माहिती आदान प्रदान करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सीमावर्ती भागातील अवैध वाहतुकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. नेपानगर विधानसभेची पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यास संदर्भात ‌ एकमेकांना सहकार्य करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *