उसतोड मजुरांच्या गाड्या अडवल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांना अटक व सुटका

मराठवाड़ा

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १६ सप्टेंबर

उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत,आज  बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी बीड जिल्ह्यातील आष्टी येथे शिराळ वाकी चौकात उसतोड मजुरांच्या गाड्या अडवल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली.मात्र, त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली आहे.


बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी आष्टीत मजूर टॅंपोत कारखान्याकडे जात असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांना मिळाली. तेव्हा त्यांनी मजुरांना परत जाण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र,मजुराचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय एकही मजूर कारखान्याकडे जाऊ देणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतल्याने  रियाज कलीम पठाण यांच्या फिर्यादीवरून आमदार सुरेश धस यांच्यावर ३४१, ३४ भा.द.वि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी सुरेश धस याना अटक केली. मात्र त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात  काही उसतोड मजूर ट्रक्टर मधून जात होते. तेव्हा धस यांनी त्यांना विनंती करून घरी पाठवले होते.काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी शिरूर कासार, आष्टी आणि डोंगरकिन्ही येथे गोपीनाथ मुंडे उसतोडणी कामगार आणि मुकादम संघटना त्याचबरोबर ऊसतोड मजूर मुकादम संघटनेच्या बैठका घेतल्या आहेत.  त्यांनी या बैठकांमध्ये अनेक मागण्या केल्या आहेत. दरम्यान, सुरेश धस म्हणाले की,  उसतोड मजुराला दिला जाणारा  मजुरीचा दर हा किमान वेतन कायद्याप्रमाणे सध्या मिळणाऱ्या मजुरीच्या निम्माच आहे. त्यामुळे दीडशे टक्के वाढ मिळायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रतिटन १ हजार रुपयाचा भाव मिळाला पाहिजे. अशी त्यांनी सांगितले आहे.दरम्यान, आ सुरेश धस यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. जयंत पाटील यांच्या ऐवजी शरद पवार चर्चेत असतील, तरच उसतोड मजुराचा दर वाढविण्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *