उमरखेड शहरातील सराफ बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; ९०८२० रोकड रकमेसह ३,५२,८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राइम विदर्भ

यवतमाळ|राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)

दिनांक २२ सप्टेंबर

उमरखेड शहरातील सराफ बाजारामध्ये गोचर स्वामी वार्ड परिसरातील बंटी श्रीवास्तव यांच्या घरी सुरू सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर  डीवायएसपी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ९०८२० रोकड रकमेसह १५ मोबाईल व ४ मोटर सायकल असा ३,५२,८२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांची जुगाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

प्राप्त माहितीनुसार,. उमरखेड शहरात सराफा बाजार परिसरातील गोचर स्वामी वार्डात बंटी श्रीवास्तव यांच्या घरी मोठ्याप्रमाणावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती डीवायएसपी अनुराग जैन यांना मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून बंटी श्रीवास्तव यांच्या घरी धडा टाकले. यावेळी जुगार खेळणाऱ्या पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९०८२० गुरुकुल रक्कम व १५ मोबाईल आणि चार मोटर सायकल असा एकूण ३,५२,८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी बंटी श्रीवास्तव (उमरखेड), कृष्णा संभाजीराव शिंदे (कराडी), तुकाराम शामराव शिंदे (कराडी), बंडू वानखेडे, सुनील देवसरकर (उमरखेड), विलास भांडवले  यांच्यासह १५ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४,५, तसेच आयपीसी १८८, २६९, २७१, ३४ अन्वये कारवाई केली आहे.

पोलिसांच्या पथकात  डिवायएसपी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, उमेश चव्हाण, रवी बोरकर, वसीम शेख, राखी शिरसाठ, कोमल पवार यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *