उमेद अभियानावर शासनाची वक्रदृष्टी ; अभियानात बदल करण्याच्या हालचाली

विदर्भ

• उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचेेे शासनाने दिलेे आदेश


        • अभियान बाह्य यंत्रणेकडे सुपर विण्याच्या हालचाली होत असल्याने उमेद अभियानातील महिलांसह कर्मचाऱ्यांवर उपजीविकेचे संकट


पुसद| राजेश ढोले, दिनांक २३ सप्टेंबर

राज्यात सन २०११ पासून सुरू असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान,उमेद राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहात समाविष्ट करून त्या कुटुंबांना उपजीविका मिळवून देणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या अभियानाचा राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना चांगला लाभ होत असताना या अभियानातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. शासनाने १० सप्टेंबर रोजी पत्र पाठवून या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे, त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये  असे कळविल्याने या दिनातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. दरम्यान, उमेद अभियान बाह्य यंत्रणेकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा असून शासनाच्या पत्रामुळे उमेद अभियानातील महिला व कर्मचाऱ्यांच्या समोर उपजीविकेचे संकट उभे ठाकले आहे.

 

ग्रामीण भागातील दारिद्र्य दूर करण्याच्या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद सुरू केले. या अभियानात राज्यभरातील सुमारे ५० लाख महिला जोडल्या गेले असून पुसद तालुक्यात सुमारे २७ हजार महिला उमेद अभियानात आहेत. या अभियानात बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे शासनाने दिनांक १० सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रावरून स्पष्ट होत आहे. ही बाब समाज माध्यमांद्वारे   समजून आल्याने महिलांनी माजी आमदार मनोहरराव नाईक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन उमेद अभियानात बदल केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

उमेद अभियाना संदर्भात दोन दिवसात पाठ पुरावा करून कळवितो असे आश्वासन माजी आमदार मनोहरराव नाईक यांनी दिले. यावेळी पुसद तालुक्यातील उमेद अभियानातील राहुल देशमुख, गौरव कांबळे, दिगंबर राठोड, प्रशांत पोपळघट यांच्यासह महिला कॅडर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *