जामठी येथील बौद्ध समाज स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे ; वंचित बहुजन आघाडीने दिले प्रशासनाला निवेदन

जळगाव

बोदवड, दिनांक २३ सप्टेंबर

जामठी टीम बोध समाज स्मशानभूमीवर करण्यात येईल अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने (भारिप बहुजन महासंघ) प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात आज बुधवार,दिनांक २३ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन करून  प्रशासनाकडे निवेदन सादर केले.

 

चार दिवसांपूर्वीच बौद्ध स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यास गेलेल्या समाजबांधवांसोबत गटनंबर  १३/४ ज्या जागेवरून काही शेतकऱ्यांनी वाद घातला होता.  यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात आज वंचित बहुजन आघाडी कडून बोदवड तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना निवेदन देण्यात आले. गटनंबर १३/४ या जागेवर पूर्वीपासून बौद्ध समाज स्मशानभूमी आहे. याठिकाणी समाजाकडून अंत्यसंस्कार केले जातात.मात्र जाणीवपूर्वक या जागेवर काटेरी कुंपण करून करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश ईखारे, अॅड. विनोद इंगळे, महेंद्र सुरळकर, तालुकाध्यक्ष सुपडा निकम, सलीम शेख, नागसेन सुरळकर, गोपीचंद सुरवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *