नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज

विदर्भ

•  ४० पैसे आणेवारीने  पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद तथा राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश संघटक चक्रधर पाटील देवसरकर यांची मागणी


यवतमाळ |राजेश ढोले,(जिल्हा प्रतिनिधी )

दिनांक २३ सप्टेंबर

‌‌‌मागील मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटले असून उमरखेड तालुक्यात आहे यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. पावसाने उघडीप दिल्याने आणि ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा लागल्या नाहीत. त्यातच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पडलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांवर रोग पडल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संकटात सध्या सुरू असलेल्या पावसाने पुन्हा भर टाकली आहे. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन ४०  पैशांच्या आतील आणेवारी अहवाल शासनाकडे सादर करुन आर्थिक मदतीचे प्रस्ताव तातडीने पाठवण्यात यावे अशी मागणी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद तथा  राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश संघटक चक्रधर पाटील देवसरकर यांनी केली आहे.

पावसामुळे आधीच उडीद मुगाच्या हंगाम वाया गेला असताना आता सोयाबीन पिकाचेही पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे   शेतकऱ्यांना यावर्षीच्या उत्पन्नाची हमी राहिलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे. हे सर्व लक्षात घेता शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक आधार देण्याची गरज आहे.

पावसामुळे शेतातील कापूस, सोयाबीन ,बाजरी,ऊस आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.कापूस पक्वतेकडे आला असतानाच शेतात पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याने कापसाची बोंडे नासून चालले आहेत‌.सोयाबीन शेंगा व ज्वारीच्या कणसांना कोमारे फुटल्याने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. यासाठी त्यांना हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करायला हवे अशी मागणी चक्रधर पाटील देवसरकर यांनी केली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *