केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाच्या निषेधार्थ उद्या जळगाव येथे विविध संघटनांचा रास्तारोको

जळगाव

• केंद्र शासनाच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ उद्या होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचेसह विविध संघटनांचेेेे कार्यकर्ते सहभागी होणार


• रास्ता रोको आंदोलनाचा पूर्वतयारीसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  विविध संघटनांची बैठक संपन्न


जळगाव, दिनांक २४ सप्टेंबर

केंद्र शासनाने पाशवी बहुमताच्या जोरावर लोकसभेत आणि दडपशाहीच्या बळावर राज्यसभेत शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे तीन विधेयक मंजूर केले आहेत. हे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण देशभरात विविध संघटनांकडून उद्या शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात लोकसंघर्ष मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, कम्युनिस्ट पार्टी तसेच संविधान जागर समिती, मौलाना आझाद विचार मंच, मराठा छावा संघटना आदी संघटना एकत्रितपणे बांभोरी जवळ गिरणा पुलावर सकाळी ११ वाजता रास्ता रोको करणार आहे.
यासंदर्भात विविध संघटनांची अत्यंत तातडीची बैठक लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र शासनाने शेतकऱ्यांची पिळवणूक व अन्याय करणारे मूल्य आश्वासन व कृषी करार कायद्यासह विधेयक संसदेत मंजूर करून घेतले आहेत.
केंद्रातील सत्ता ही ज्या पद्धतीने गेल्या काळात आजवरच्या लोकाभिमुख आणि येथील शोषित दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांच्या सोबत मोडतोड करून हा देश भांडवली व सरंजामी शक्तींच्या घश्यात घालू बघतेय ही येणाऱ्या हुकूमशाही प्रस्थापित शासनव्यवस्थेची तयारी चालू आहे असा सूर बैठकीत उमटला.
यावेळी बोलताना समुद्राच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे म्हणाल्या,
केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून कुठलीही चर्चा न होऊ देता आवाजी मतदानाने शेतकरीविरोधी विधेयक पारित केलीत. ही विधेयके ग्रामीण शेती व्यवस्थेचे कंबरडे मोडणारी व त्यांना उध्वस्त करणारी आहे त्याच घाईगडबडीत व विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला असतांना कामगार वर्गाने प्रदीर्घ काळ लढून त्यांच्या सरंक्षणासाठी असलेले १४ कायदे मोडीत काढून त्यांचे ४कोड मध्ये रूपांतर करत कामगारांना असलेले सरंक्षणच काढून घेणारे नवे कायदे पारित केलेत हा येथील शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार यांच्यावर अन्याय आहे. या कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकरी व कामगार तसेच सर्वच नागरिक रस्त्यावर उतरून २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी सत्याग्रह करणार आहेत.

बैठकीत उपस्थित सर्व संघटनांनी शेतकरी विरोधी विधेयकांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, माजी उपमहापौर करीम सालार, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, संजय महाजन,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, विनोद देशमुख, संविधान जागर समितीचे भारत ससाणे, मनियार बिरादरीचे फारूक शेख, वंचित बहुजन आघाडीचे हरिश्‍चंद्र सोनवणे, छावा संघटनेचे प्रमोद पाटील, मराठा युवक चावा संघटनेचे अमोल कोल्हे, भरत कर्डिले, किरण वाघ, फारुख कादरी, प्रहार जनशक्ती पक्षाचे विजय भोसले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनी दूरध्वनीद्वारे आंदोलनात सहभागी होण्याचे कळविले.

1 thought on “केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाच्या निषेधार्थ उद्या जळगाव येथे विविध संघटनांचा रास्तारोको

Leave a Reply