केंद्र शासनाने संमत केलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाविरुद्ध विविध संघटनांचा जळगावात एल्गार ; राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या आंदोलनाने वेधून घेतले लक्ष

जळगाव

जळगाव, दिनांक २५ सप्टेंबर

‌‌‌              केंद्र शासनाने शेतकरी विरोधी मंजूर केलेल्या तीन विधेयकांचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच कामगार धोरणाच्या धिक्कार करण्यासाठी आज जळगाव शहरातील पुलानजीक लोकसंघर्ष मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, संविधान जागर समिती, छावा मराठा संघटना, मौलाना आझाद विचार मंच, कम्युनिस्ट पार्टी, मनियार बिरादरी यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांनी आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, हाजी गफारभाई मलिक, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, संजय महाजन,सोपान पाटील, विनोद देशमुख, करीम सालार, योगेश देसले,संविधान जागर समितीचे भारत ससाणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हितेश पाटील, मनियार बिरादरीचे फारुख शेख, छावा मराठा संघटनेचे प्रमोद पाटील, छावा युवक मराठा संघटनेचे अमोल कोल्हे, किरण वाघ, भरत कर्डिले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी केंद्र शासनाच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडले.

आंदोलनस्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात होता. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *