युद्धासाठी सज्ज राहण्याचे चीनी सैनिकांना राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आदेश

आंतरराष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १५ ऑक्टोबर

मागील काही महिन्यांपासून भारत व चीन यांच्या सैनिकांत प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. या पार्श्भूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना युद्धासाठी सज्ज रहाण्याचे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी दिले आहेत.शिन्हुआ या चिनी वृत्त संस्थेच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.देशाशी पूर्णपणे निष्ठावान रहा, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.

चीनचे लष्करी स्थळ असलेल्या गुआंगडोंग येथे शी जिनपिंग यांनी भेट दिली. यावेळी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत युद्धासाठी सज्ज राहावे व चीनशी निष्ठा राखण्याचं आवाहन जिनपिंग यांनी सैन्याला केलं.

मागील अनेक दिवसांपासून भारत, अमेरिका आणि दक्षिण चीन सागरातील अन्य देशांबरोबर चीनचा वाद सुरु आहे. सीमेवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा अधिक सैनिक ठार झाले. त्यानंतर पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. चीनची कुठलीही दादागिरी सहन न करता, भारतानेही प्रत्येकवेळी चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण चीन सागरात अमेरिकेबरोबरही त्यांचा वाद सुरु आहे.

भारताच्या पूर्व लडाख भागात सीमावादाची कुरापत काढल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे. चीनकडून टाइप ३०५ आणि टाइप ९२८ डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-९० ची कॉपी आहे.

भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात आहे. जगभरातील नौदलं ज्या लो पापाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सरु आहे. ताज्या उपग्रह छायाचित्रांवरुन हा खुलासा झाला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, भारतीय सैनिक सीमेवर जागता पहारा देत असून कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढून जशास तसे उत्तर देण्यास सज्ज आहेत.

 

 

Leave a Reply