बोरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने रावेर तालुका हादरला

क्रीड़ा जळगाव

 • गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई  करण्याची लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांची मागणी


रावेर|नजमोद्दिन शेख, दिनांक १६ ऑक्टोबर

­“ जळगाव जिल्ह्यात  रावेर  तालुक्यातील बोरखेडा येथे  शेतातील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस येताच रावेर तालुका हादरला असून महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोषींना तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी केली आहे. ”


रात्रीच्या सुमारास  चार भावंडांची अज्ञातांनी कुर्‍हाडी गळा चिरत हत्या केल्याची घटना आज रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडली. मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बोरखेडा येथे मस्तफा यांच्या केळी बागेत शेतात सालदारकी करून उदरनिर्वाह करणारे मेहताब गुलाब भिलाला आणि रुमलीबाई भिलाला हे दाम्पत्य मोठ्या मुलासह  मध्य प्रदेशातील आपल्या मूळ गावी गढी ता.बिस्टान जिल्हा खरघोन येथे उत्तर कार्याच्या कार्यक्रमास गेले होते.तर शेतातील घरात चार अल्पवयीन भावंडे एकटी होती. रात्रीच्या सुमारास १४ वर्षाची मुलगी व सात वर्षाच्या मुली सह दोन मुले असा चौघांचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. सविता (१४), राहुल (११),अनिल(८) व राणी (५) अशी हत्या झालेल्या मुलांची नावे आहेत.

घटनास्थळी चारही अल्पवयीन मुलांचे  रक्तावस्थेतील  मृतदेह पाहून आई वडील बेशुद्ध झाले. मुलांची  कुर्‍हाडीनेेे गळा चिरून हत्या झाल्याने आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावून घेत होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना केल्या. दरम्यान, मारेकऱ्यांचा  शोध  पोलिसांनी सुरू केला आहे.

खुनासह या प्रकरणात अजून घातपात घडला आहे किंवा कसे याबाबत सखोल चौकशी करण्याची यावी व सर्व सत्य तथ्यांसह समोर आणून मारेकऱ्यांचा शोध घेण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे,भरत बारेला, प्रकाश बारेला, गाठू बारेला, नुरा तडवी, इरफान तडवी, ताराचंद पावरा, कैलास भिलं,पन्नालाल मावळे आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *