महाराष्ट्राचे सेवानिवृत्त कामगार आयुक्त दिवंगत मनोहर बी. गजरे यांचा उद्या मंगळवारी श्रद्धांजली सभा व पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम

जळगाव मुंबई सामाजिक

मुंबई | विशेष प्रतिनिधी, दिनांक २६ ऑक्टोबर

               महाराष्ट्राचे सेवानिवृत्त कामगार आयुक्त दिवंगत मनोहर बी. गजरे (वय ७१)यांचे चेंबूर (मुंबई) येथे दिनांक २३ ऑक्टोबर २०२०  रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा पुण्यानुमोदन व श्रद्धांजली सध्याचा कार्यक्रम उद्या मंगळवारी दिनांक  २७ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी  विजयकुमार गाढे यांनी दिली आहे.


कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले  दिवंगत मनोहर बी. गजरे साहेब यांचा कामगार कायद्यामधील गाढा अभ्यास कामगार चळवळीला पोषक ठरला. कामगारांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी त्यांनी प्रशासकीय धोरणाच्या माध्यमातून सातत्याने कार्य केले. ते मूळ जळगाव जिल्ह्याचे रहिवासी होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामगार मनोहर बी. गजरे साहेब यांच्यावर प्रभाव होता. समाजातील आंबेडकरी विचारांना सोबत घेऊन संघर्षातून वाटचाल करत दिवंगत मनोहर गजरे साहेब यांनी प्रशासकीय कारकिर्दीत राज्याचे कामगार आयुक्त आपली वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांच्या निधनामुळे कामगार चळवळीला मार्गदर्शन करणारा एक अलौकिक तारा निखळला असल्याच्या प्रतिक्रिया कामगार वर्गातून व्यक्त होत आहे. मनोहर बी. गजरे साहेब यांच्या पश्चात उच्चशिक्षित २ मुले, सूना, जावई असा परिवार असून परिवारातील सर्वच जण सामाजिक जाणिवेतून आंबेडकरी विचारांवर सक्रिय कार्य करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *