काकडदाती येथे दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलने साजरा केला धम्मचक्र प्रवर्तन दिन

विदर्भ

पुसद|राजेश ढोले, दिनांक २६ ऑक्टोबर

पुसद तालुक्यातील काकडदाती येथे बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल तर्फे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य भोलेनाथ कांबळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य देवेंद्र खडसे हे होते.

कार्यक्रमात शाखाध्यक्ष ए.सी. कांबळे, लक्ष्मण कांबळे, सिटीझन मिररचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले,संतोष सोनोने, समाधान केवटे, सुनील मनवर, शरद ढेंबरे, धुळे सर, भारत कांबळे, राहुल पडघणे, विजय निखाते, माधव कांबळे, अॅड. दिवेकर, सौ.दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जगात सुख शांती हवी असेल तर युद्ध नाही तर बुद्ध आवश्यक आहे. इथं माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देतो. प्रत्येक समस्यांवर उत्तर देणारा बुद्ध धम्म विज्ञाननिष्ठ आहे. असा विचार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यशस्वीतेसाठी बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूलच्या काकडदाती शाखेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *