ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा; रोहित शर्मा संघाबाहेर

क्रीड़ा

• विराट कोहली कर्णधारपदी कायम, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य  रहाणे तर टी २० व एक दिवसीय  संघाच्या उपकर्णधार पदाची धुरा केेेएल राहुलच्या खांद्यावर


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २६ ऑक्टोबर

भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह प्रारंभ होणार आहे.१० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली ला कायम ठेवण्यात आले असून कसोटी सामन्यांसाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार पदी कायम राहणार आहे.टी२० व एकदिवसीय सामान्यांसाठी के एल राहुल याला उपकर्णधार पदी संधी देण्यात आली आहे.या दौऱ्यासाठी मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही, पण आयपीएलमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

टी२० संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

एकदिवसीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *