पोलिस बॉइज असोसिशनच्या रावेर तालुका सरचिटणीसपदी पत्रकार नजमोद्दीन‌शेख मुनीर यांची‌ नियुक्ती

जळगाव

रावेर, विशेष प्रतिनिधी, दिनांक २९ ऑक्टोबर

          कायदा व सुव्यवस्थेचा सन्मान अबाधित रहावा यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनच्या रावेर तालुका सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार नजमोद्दीन शेख यांची नियुक्ती जळगाव जिल्हा अध्यक्ष नितीन ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली.रावेर तालुका अध्यक्ष सिध्दार्थ झाल्टे यांच्याहस्ते त्यांंना नियुक्तीपत्र देण्यात आले.

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रती असलेला आदरभाव व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाला केले जात असलेले सहकार्य याची दखल घेऊन नजमोद्ददीन शेख मुनीर यांची रावेर तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

बैठकीस पोलीस बॉईज असोसिएशनचे  जिल्हा उपाध्यक्ष मंगलसिग राजपुत, जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटिल, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल भालेराव, जिल्हा सचिव  गणेश पवार, यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे, भुसावळ तालुका अध्यक्ष दिनेश परदेशी, चोपडा तालुका अध्यक्ष  मुन्ना ठाकुर, पाचोरा तालुका अध्यक्ष  नदीम शेख,चाळीसगाव तालुका अध्यक्ष  निखिल सोनवणे, रावेर तालुका कार्याध्यक्ष  अशोक अटकाळे, रावेर तालुका सचिव विजय धनगर, यावल तालुका उपाध्यक्ष राजेश अडकमोल, यावल शहरध्यक्ष वशिम तडवी, चोपडा शहरध्यक्ष  पंकज पाटिल यांच्यासह पोलिस बाँईज असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *