• शेतकऱ्याच्या कुटुंबास दिला १५ हजार रुपयांचा धनादेश
यवतमाळ| राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)
‘नाम’ फाऊंडेशन तर्फे सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला पंधरा हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला.
उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथील शेतकरी सुनिल दत्तराव सोळंके यांनी दीड एकर शेतीत खरीपाअंतर्गत सोयाबीन पीकाची एकदा दोनदा नव्हे तर तिनवेळा पेरणी केली.दरम्यान अतिवृष्टीमुळे पिक निघाले नाही.मागील वर्षीही नापिकीची परिस्थिती आल्याने तसेच पिक कर्ज एक लक्ष पन्नास हजार रुपये व थकीत साठ हजार रुपये कर्ज कसे फेडायचे यामुळे ते चिंताग्रस्त होते.यामुळे त्यांनी ७ जुलैला नागेशवाडी येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. कुटुंबातील कर्ता गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. वयोवृद्ध सासू, दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी विधवा पत्नीवर पडल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला.
ह्या आपत्तीग्रस्त कुटुंबाची माहिती नाम फाऊंडेशनचे समन्वयक स्वप्निल देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर प्रकरण वरिष्ठांकडे पाठवून नाम चे विदर्भ व खानदेश समन्वयक हरीश इथापे यांनी मदतीचा प्रस्ताव मंजूर करून मृतकाच्या पत्नीच्या नावे पंधरा हजार रुपयांचा धनादेश पाठवून दिला. आत्महत्त्याग्रस्त कुटुंबाला श्रीरामपूर येथे ‘नाम’च्या वतीने उपक्रमशिल शिक्षक शशिकांत जामगडे यांचे हस्ते व सामाजिक कार्यकर्ते किरण देशमुख सवणेकर,प्रफुल्ल जोशी, नाम चे पुसद उपविभागीय समन्वयक स्वप्नील देशमुख,व्यंकटेश चिद्दरवार यांच्या उपस्थितीत मयत शेतकऱ्यांच्या पत्नी स्वाती सोळंके यांना पंधरा हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.यावेळी त्यांचे बंधू निर्गूण कदम व आनंदा नरवाडे हे उपस्थित होते.
The rise of Citizen Mirror as India’s leading online news channel within a short span of its existence owes a lot to the vision of its chairman and editor-in-chief Bharat Sasane and the dedication and toil of its ever-growing team of Citizen Mirror professionals.