बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर मिळालेल्या विजयाचा एमआयएम कार्यकर्त्यांनी जळगाव शहरात पेढे वाटून केला जल्लोष

जळगाव राजकीय

जळगाव, दिनांक ११ नोव्हेंबर

बिहार विधानसभा निवडणुकीत खा.बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम या पक्षाने जबरदस्त प्रदर्शन करत पाच जागांवर विजय मिळविला आहे. या विजयाचा जल्लोष करून जळगाव शहरातील  एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना  पेढे वाटून आनंद साजरा केला.

बिहार मधील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे एमआयएमचा बिहारच्या राजकारणात दमदार प्रवेश झाला असून नागरिकांच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी बिहार विधानसभेत एमआयएमचे निवडून आलेले सर्व पाचही आमदार आवाज उठवतील असा आशावाद व्यक्त करून जळगाव शहरात पदाधिकाऱ्यांनी लक्षवेधी जल्लोष करून जागोजागी नागरीकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.यावेळी एमआयएमच्या विद्यार्थी विंगचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सानिर सय्यद, जिल्हाध्यक्ष जिया बागवान, नगरसेवक पत्ता मनपातील एमआयएम गटनेते रियाज बागवान, अक्रम देशमुख, हाजी युसुफ, खालीद खाटीक, सईद शेख, इम्रान शेख, जाविद शेख, शोएब शेख, शकीर शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आनंदोत्सवात सहभागी झाले.

Leave a Reply