महावितरण विद्युत सहाय्यक भरतीची यादी २० डिसेंबरपर्यंत जाहीर न झाल्यास जळगाव येथे आंदोलन करण्याच्या इशारा

जळगाव

जळगाव :- राज्यशासनाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विद्युत सहायक पदासाठी ५ हजार जागांची भरती प्रक्रिया जून २०१९ मध्ये राबविली होती.यावेळी दोन महिन्याच्या आत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल असे शासनाकडून तसेच महावितरण कडून घोषित करण्यात आले असताना आजपावेतो यादी जाहीर करण्यात आलेली नाही.यामुळे विद्युत सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून २० डिसेंबर पर्यंत यादी जाहीर न केल्यास जळगाव येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यादी प्रसिद्ध होण्याच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार प्रतीक सपकाळे यांनी दिला आहे.यासंदर्भात विद्युत सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसोबत प्रत्यक्ष संपर्क साधत आंदोलनाबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती प्रतीक सपकाळे यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर डॉ.नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी उमेदवारांच्या निवेदनाची दखल घेऊन महावितरण मधील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्युत सहायक पदासाठी ८ दिवसात निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करावी असे आदेश दिले होते. मात्र तरी सुद्धा अद्याप पावेतो यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी २० डिसेंबर पर्यंत जाहीर करण्यात यावी अन्यथा जळगाव येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रतीक सपकाळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *