दिल्ली जयपूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी केला जाम

राष्ट्रीय

• लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी


दिल्ली | सिटीजन मिरर वार्ता

आज रविवार दिनांक मंगळवार १३ डिसेंबर रोजी जयपूरहून दिल्लीकडे जाणारा अखेरचा राष्ट्रीय महामार्ग राजस्थान-हरियाणा सीमेवर शहाजहाँपूर येथे संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या हजारों शेतकऱ्यांनी बंद करून टाकला! इतर चार महामार्ग यापूर्वीच बंद केले गेले आहेत. आता सुरू असलेल्या ऐतिहासिक देशव्यापी शेतकरी आंदोलनाचा ही कृती एक अविभाज्य भाग होता.

हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात हनन मोल्ला, डॉ. अशोक ढवळे, राजू शेट्टी, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव, सत्यवान, कविता कुरुगंटी, वेंकटरामय्या हे AIKSCC चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, तसेच आमरा राम, पी. कृष्ण प्रसाद, विजू कृष्णन, मेजर सिंह, सुरेंद्र सिंह, फुलसिंह शेवकंद, विक्रम सिंह, उषा राणी, मयुख विश्वास आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *