गांजा विक्री: पारोळा मार्गे कल्याणला गांजा पुरवठा करणारे अमळनेर कनेक्शन उघड

क्राइम जळगाव

• पारोळा येथील एका महिलेसह पुरुषाच्या अटकेनंतर अमळनेर मधील चर्चित अशोक कंजर याला अटक


जळगाव| दिनांक १३ डिसेंबर

 

जळगाव|दिनांक १३ डिसेंबर

कल्याण येथे होत असलेल्या गांजा तस्करी प्रकरणात पारोळा मार्गे अमळनेर कनेक्शन उघड झाले असून पारोळा येथून एक महिला व एका पुरुषाला ताब्यात घेतल्यानंतर अमळनेर येथील चर्चित अशोक कंजर यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई कल्याण पश्चिम पोलिसांनी केली आहे.
यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की; कल्याण येथे ७ डिसेंबर रोजी पावणे दोन किलो गांजा विक्री प्रकरणात पारोळा तालुक्यातील मुंदाने येथील रोशन पांडुरंग पाटील यांना कल्याण पश्चिम येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने पारोळ्यातील साने गुरुजी कॉलनी मधील उषाबाई रमेश पाटील यांच्याकडून गांजा घेतल्याचे सांगितले. या माहितीवरुन महात्मा फुले पोलिस ठाणे, कल्याण पश्चिमचे सपोनि दीपक सरोदे यांनी सहकारी पोलिसांना सोबत घेऊन सदर महिलेची चौकशी केली असता हा गांजा अमळनेर येथून अशोक कंजर यांच्याकडून खरेदी केल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच अशोक कंजर यांच्याकडून १०० किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला होता. त्यावेळीही त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *