मांडवा येथील जिल्हा परिषद शाळेला घाणीचा विळखा

विदर्भ

यवतमाळ|राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)

पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा मांडवा शाळेसमोरील नाल्यावरील धाबा (रपटा) साप न केल्यामुळे नालीचे पाणी शाळेच्या आवारात जात होते . यासंदर्भतील तक्रार ग्रामसेवकांकडे नागरिकांनी केल्यानंतर ग्रामसेवकांनी नालीवरील धाबा (रपटा) साफ न करताच शाळेच्या गेटसमोर सिमेंट काँग्रेटचा बांध टाकल्याने  शाळेच्या गेटसमोरील नालीचे पाणी नालीत न जाता रोडवरून वाहत आहे .त्यामुळे वार्ड क्रमांक ३ कडे जाणाऱ्या रस्त्यावरून ये – जा करताना नागरिकांना चिखलातून मार्ग शोधावा लागत आहे . तसेच शाळेच्या गेटसमोर पाणी साचल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. तसेच बाजूलाच  अंगणवाडी  क्रमांक२ आहे. या नालीवरील धाबा (रपटा ) फोडून नवीन धाबा नालीपेक्षा उंच करावा जेणेकरून नाली मधील कचरा साफ करता येणे शक्य होईल. असे समस्त नागरिक मागणी करत आहे.

त्याचबरोबर ही बाब शाळा सुधार समिती अध्यक्ष विष्णू ईखार यांनी ग्रामसेवक मंगेश देशमुख यांना अनेक वेळा सांगून सुद्धा ग्रामसेवकांचे
या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *