हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची येरवडा कारागृहात रवानागी

राज्य

पुणे|सिटीजन मिरर वार्ता, दिनांक १८ डिसेंबर

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगळवार दिनांक १५ डिसेंबर रोजी चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना आज १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

        दरम्यान, आज त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बचाव पक्षाचे वकील झहिर खान पठाण यांनी आज पार पडलेल्या सुनावणीनंतर याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली. हर्षवर्धन जाधव यांनी जामिन अर्ज सादर केल्यानंतर न्यायालयाने सरकारी वकिल आणि आयओ यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आम्हाला म्हणणे मांडण्यासाठी मुदत हवी आहे, असे सांगितले. परंतु, न्यायालयाने त्यांना उद्याच म्हणणे मांडण्यास सांगितले. जर उद्या म्हणणे मांडले नाही तर, उद्या जामिन अर्जावर सुनावणी करण्यात येईल,” असेही त्यांनी झहिर खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *