प.पू. हेमराज दादा पंजाबी महानुभाव यांचे निधन

जळगाव

 जुलै महिन्यात घेतली होती निवृत्त तहसीलदार हेमचंद्र भिरूड यांनी महानुभव पंथाची दीक्षा

___________________________________

जळगाव :- शहरातील महाबळ परिसरातील रहिवाशी प.पू. हेमराज दादा पंजाबी पूर्वाश्रमीचे हेमचंद्र भगवान भिरुड (वय ८४) (सेवानिवृत्त तहसीलदार) यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे शनिवार दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. दिनांक ५ जुलै २०२० मध्ये त्यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली होती. अत्यंत हुशार, शांत व संयमी असलेल्या दिवंगत हेमचंद्र भिरुड यांनी महानुभाव पंथाचा गाढा अभ्यास केला होता. तेेे महानुभाव पंथाच्या अनुयायांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले होते.
ते जळगाव शहरातील प्रतिथयश शैलेंद्र भिरुड व जयेंद्र भिरूड यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात २ मुले,१ मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर उद्या रविवार दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *