महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर अध्यक्षपदी चंद्रकांत काटे तर सचिव भटेश्वर वाणी

जळगाव

अमळनेर ( विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मंगळग्रह मंदिर परिसरात उत्तर महाराष्ट्र विभागाचे राज्य संघटक डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमळनेरचे अध्यक्ष चंद्रकांत काटे यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. बैठकीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर सचिवपदी भटेश्वर वाणी यांच्या नियुक्ती सह उर्वरित कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

‌ यावेळी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत तसेच पत्रकारांच्या समस्यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी अध्यक्ष चंद्रकांत काटे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.यात उपाध्यक्षपदी -विजय गाढे,मिलिंद पाटील,सचिव-भटेश्वर वाणी,सह सचिव-जितेंद्र पाटील,खजिनदार-ईश्वर महाजन,संघटक-गौतम बिऱ्हाडे,व
कार्यकारिणी सदस्य म्हणून जयंतीलाल वानखेडे,अजय भामरे,संजय मरसाळे,समाधान मैराळे,नूर खान,राहुल पाटील, गुरणामल बठेजा तर सल्लागार म्हणून डिगंबर महाले सर,पांडुरंग पाटील,प्रा. जयश्री दाभाडे,उमेश धनराळे,
विवेक अहिरराव यांची निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीला पत्रकार सुनील करंदीकर,सचिन चव्हाण,काशिनाथ चौधरी,मनोज चित्ते,महेंद्र पाटील,सुखदेव ठाकूर,राहुल पाटील,प्रसाद जोशी,रोहित बठेजा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *