अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाची अमळनेर नगरपालिकेत शाखा स्थापन

जळगाव

संघटनेच्या नामफलकाचे नगरपरिषद आवारात झाले उद्घाटन


अमळनेर :- अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाची शाखा अमळनेर नगरपरिषदेत करण्यात आली असून संघटनेच्या अध्यक्षपदी रुपचंद पारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


नगरपरिषदेच्या आवारात अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या नामफलकाचे उद्धाटन संगटनेचे धुळे येथील जिल्हाध्यक्ष संतोष अप्पा पारेराव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संघटनेचे धुळे महानगपालिका अध्यक्ष सुरेश लोंढे,धुळे जिल्हा संघटक पुंजुराव अहिरे, भारतीय बौध्द महासभेचे बी. टी.अहिरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


विशेष म्हणजे अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाची शाखेच्या नामफलक उद्धाटन कार्यक्रमात कामगार युनियन अध्यक्ष विनोद जाधव, अखिल भारतीय मजदुर काँग्रेस युनियनचे अध्यक्ष बिंदुकुमार सोनवणे,सचिव राजू चंडाले यांनी उपस्थिती देऊन कामगार संघटनांच्या एकतेचा परिचय दिला.
कार्यक्रमास सामजिक कार्यकर्ते प्रवीण संदानशिव,राजू जाधव,गौतम सोनवणे,अर्जुन कढरे, प्रितम संगेले,किशोर गोयर, भिवसन कढरे हे उपस्थित होते.
या वेळी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या अमळनेर नगरपालिका शाखेच्या खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.उपाध्यक्ष,- गौतम मोरे,सरचिटणीस- मुकेश बिऱ्हाडे,कार्याध्यक्ष- विकास मोरे, सहसरचिटणीस- नवल बिऱ्हाडे, कोषाध्यक्ष- जुलाल बिऱ्हाडे,सल्लागार – रघुनाथ मोरे,कायदेशीर सल्लागार – अॅड.रणजित बिऱ्हाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *