प्रजासत्ताक दिनी शेतकरी विरोधी कायद्या विरुद्ध जळगाव शहर एकवटले

जळगाव

संविधान बचाव नागरी कृती समिती व संयुक्त किसान मोर्चाने काढलेल्या तिरंगा किसान रॅलीत व्यक्त झाला केंद्र सरकार विरोधात रोष


कृषी विधेयकांचा धिक्कार करणाऱ्या घोषणांनी वेधले जळगाव करांचे लक्ष


जळगाव :-

केंद्र शासनाने पारित केलेल्या तीन अन्यायकारक कृषी विधेयकाविरोधात संविधान बचाव नागरी कृती समिती व संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मंगळवार दिनांक २६ जानेवारी रोजी काढलेल्या  तिरंगा किसान रॅलीत केंद्र सरकार विरोधात जळगावकरांनी तीव्र रोष व्यक्त करत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकार विरुद्ध देण्यात आलेल्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडले. रॅलीत नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले.

केंद्र सरकारने जून २०२० मध्ये तीन कृषी विधेयक संसदेत चर्चा न करता पारित केले आहेत. या अन्यायकारक शेतकरी विरोधी कायद्या विरुद्ध देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा किसान रॅलीची सुरुवात रेल्वे स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी ११ वाजता झाली. यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकचे वाचन करून शपथ देण्यात आली.

­“प्रजासत्ताक दिनाचा विजय असो” “ जय जवान जय किसान”  “शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा” “धर्मनिरपेक्ष भारत जिंदाबाद” अशा घोषणा देत रॅली जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून काढून शिवतीर्थ मैदानावर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाा अभिवाद करून रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने शेतकरी आंदोलनावर सादर केलेले पथनाट्याने  लक्ष वेधून घेतले.

याप्रसंगी मुकुंद सपकाळे केंद्र शासनाच्याा शेतकरी व जनहिताच्या धोरणाविरुद्ध केंद्र शासनाविरुद्ध जोरदार हल्ला चढविला.  आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संविधानाचे, लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी पेटून उठले पाहिजे असे प्रतिपादन करून  संविधानाची पायमल्ली करण्याची हिंमत कोणी करणार नाही यासाठी जागरुक राहण्याचे आवाहन केले. यावेळी वंदना चौधरी, मुक्ती हारून नदवी, अमोल कोल्हे, फारुक शेख, रमेश सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रा. प्रितिलाल पवार यांनी केले.आभार  हरिश्‍चंद्र सोनवणे यांनी मानले. रॅलीत  समाधान सोनवणे, भारत सोनवणे,फहिम पटेल, अय्याज अली, दिलीप सपकाळे, मुश्ताक सालार,श्रीकांत मोरे, कॉ, अखिल बापू कोळी, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, दत्तू पाटील, संजय सपकाळे, उमेश गाढे, राजू सोनवणे, विजय मौर्य, दामू भांडे, गोलू रवा, कृष्णा सपकाळे, पिंटू सपकाळे, चंदन बिऱ्हाडे, विजयकुमार मोरे,उज्वल निकम, किरण बोराडे, नाना पाटील, कृष्ण जमदाडे, माजी नगरसेवक राजू मोरे, जगदीश सपकाळे, दत्तू सोनवणे, प्रा. फिरदौस सिद्दिकी, प्रा. परीक्षा खान, प्रा. शबान खटके, प्रा. चांद खान यांच्यासह  असंख्य महिला, पुरुष व विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *