शिवाजी नगर मधील काळे नगरात समाजकंटकांनी झाडावर घातले घाव

जळगाव

जळगाव :

गजबजलेल्या शिवाजी नगर भागातील धनाजी नगर काळे परिसरात असलेली विहीर प्रसिद्ध आहे. तसेच विहिरी जवळ असणारे डेरेदार झाड  परिसरातील नागरिकांना सावली देणारे  म्हणून ओळखले जाते. अशा विशालकाय झाडावर काही समाजकटकांनी कुऱ्हाडीने घाव घालून उभे आडवे कापून त्याचा जीव घेतला आहे. या संदर्भात शिवाजीनगर शिवसेनेचे विभागप्रमुख यांनी आवाज उठवला असुन झाडाची कत्तल करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

‘झाडे कोणाचीही, कोणतीही असोत, ती तोडायची म्हटल्यास रीतसर शासनाची परवानगी घ्यावी लागते, विनापरवानगी तोडल्यास गुन्हा समजला जाऊन कायद्याने त्याला शिक्षा होते. स्वत:च्या मालकीची सुद्धा झाडे विनापरवानगी तोडता येत नाहीत. महाराष्ट्र शासनाने फेलिंग ट्री (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट १९६४, अन्वये झाडे तोडणेबाबत कायदेशीर तरतूद केली आहे.’’महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये खासगी जागेवरील कोणत्याही झाडांना मालकी हक्क असून, कायद्यान्वये ती विनापरवानगी कोणालाही तोडता येत नाहीत. या कायद्यामध्ये अनेकवेळा दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. दि. १७ सप्टेंबर १९९२ ला महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या या कायद्याच्या पुस्तकात अनुसूची दिली आहे. काही झाडे अशी आहेत की, त्या झाडांवर स्वत:ची मालकी असो किंवा दुस-याची मालकी असो, शासनाच्या परवानगीशिवाय ती तोडता किंवा उपटता येत नाहीत.

“महापालिका हद्दीत एखादे झाड तोडण्याच्या परवानगीसाठी विहित नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे. झाड किंवा त्यांच्या फांद्या तोडण्याचे नेमके कारण काय, हे स्पष्ट केले पाहिजे, असा अर्ज महापालिकेत प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्याने परवानगी देण्याआधी अर्जदाराचा लेखी जबाब तसेच पंचनामा केला पाहिजे. आवश्यकता असेल तरच तोडण्याची परवानगी दिली पाहिजे. अर्जदाराने जे झाड किंवा फांद्या तोडल्या आहेत. त्याच जातीचे रोप दुसऱ्या जागेवर लावणे बंधनकारक आहे. विनापरवानगी झाड किंवा फांद्या तोडल्यास दिवस ते एक वर्षाचा कारावासाची शिक्षा होऊ शकते.” 

विनापरवानगीने झाडे तोडली, तर कायद्याने गुन्हा आहेच; परंतु ती झाडे तप्त करण्याचा अधिकार वृक्ष अधिका-याला आहे. केवळ झाडेच नव्हे, तर त्या तोडलेल्या झाडांपासून बनवलेल्या वस्तूसुद्धा कायद्याने वनअधिकारी जप्त करू शकतो आणि वृक्ष तोडणा-यावर कायदेशीर कारवाई करू शकतो.कोणत्याही प्रकारचे झाड विनापरवानगी तोडणे हा दखलपात्र गुन्हा असून, त्यात दोषी आढळून येणाऱ्यास दिवस ते वर्षाचा कारावास ते हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा होऊ शकते. यासह तोडलेल्या झाडावर पक्ष्यांचे घरटे असेल, तर वन्यजीवांची शिकार करण्याच्या कलमाखालीही शिक्षा होऊ शकते.

वृक्षतोड बाबत कायद्यात कठोर तरतुदी असताना त्याचे पालन होताना दिसत नाही हे जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातील काळे नगर मधील डेरेदार वृक्ष तोडीच्या मुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.जळगाव शहर महानगरपालिकेत वृक्ष प्राधिकरण समिती आहे. या समितीची नियमित बैठक होत नसेल तर झाडांची खुलेआम कत्तल करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना मोकळे रान मिळत आहे.  काळे नगर परिसरातील विहिरी जवळील झाडाची आर्थिक फायद्यासाठी कत्तल करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *