अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हॅण्डल निलंबित

मुंबई राष्ट्रीय

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल  ट्वीट करत आक्षेपार्ह भाष्य केल्याने झाली कारवाई


मुंबई :- सिटीजन मिरर वार्ता

नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर करून ट्विट केल्याने ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याने वादग्रस्तत अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट  निलंबित करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर कंगना अनेकदा भाजपा आणि पंतप्रधानांच्या समर्थनार्थ व्यक्त होत असते. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगनाने तृणमूल काँग्रेसला लक्ष्य  केले आहे. कंगनाने नुकतेच एक धक्कादायक ट्विट देखील केले होते.

सामाजिक आणि राजकीय प्रत्येक विषयावर कंगना उघडपणे आपले मत व्यक्त करताना दिसते. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यानंतर कंगना टीएमसीविरोधात अनेक प्रकारचे ट्विट करत होती. अशाच एका ट्विटमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याची कारवाई झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *