लॉक डाऊन चे उल्लंघन : रावेर येथील रुपम शॉपिंग मॉल सील

जळगाव

शटर बंद करून सुरू होता व्यवसाय


रावेर (नजमोद्दिन शेख)

कोरोना महामारी ची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात दिनांक १५ मे पर्यंत लॉक डाउन घोषित करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना रावेर शहरातील प्रसिद्ध असलेल्या तीन मजली रुपम शॉपिंग मॉल येथे शटर बंद करून व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्याने मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी पालिका व पोलिस कर्मचाऱ्यांसह रूपम शॉपिंग मॉलवर कारवाई केली आहे.

यासंदर्भात  मिळालेली माहिती अशी की, राज्यात करुणा महामारी ची दुसरी लाट अत्यंत वेगाने फैलावत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात दिनांक १५ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे. लॉक डाऊन च्या काळात किराणा व भाजीपाला विक्री सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवावेत असे आदेश आहेत. याव्यतिरिक्त दूध व दुग्धजन्य (डेअरी) पदार्थ विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत विक्रीस परवानगी देण्यात आली असून मेडिकल सेवा संपूर्ण दिवसभर सुरू राहतील जगायला जरी केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही दुकानांना लॉकडाउनच्या काळात विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना रुपम शॉपिंग मॉल येथे शटर बंद करून बिनधास्त विक्री सुरू असल्याची माहिती रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना मिळाल्याने त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांसह पोलीस व होमगार्ड पथक यांना सोबत घेऊन तपासणी केली. यावेळी  यावेळी मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटाइझर आदींं नियम धाब्यावर बसवून शॉपिंग मॉल मध्ये २५ ते ३० कर्मचाऱ्यांसह १७५ जण आढळून आले. या सर्वांचे चित्रीकरण करण्यात येऊन प्रत्येकावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या ठिकाणी तहसीलदार उषाराणी देवगुणे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली असून रुपम शॉपिंग मॉल सिल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *